झाडे आणि खेलबुडे परिवाराकडून रामेश्वर वैद्य यांचा हृदय सत्कार

shivrajya patra

तुळजापूर : तालुक्यातील मसला खुर्द येथील सरपंच रामेश्वर वैद्य यांची तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी नुकतीच निवड झाली. 

यानिमित्ताने उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे झाडे आणि खेलबुडे परिवाराकडून तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नूतन चेअरमन रामेश्वर वैद्य यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश खेलबुडे तसेच अण्णासाहेब कापसे, रेवण मिनजगी, विनोद खेलबुडे, संतोष खेलबुडे, सोमेश झाडे आणि सुवर्णा झाडे खेलबुडे उपस्थित होते.

To Top