सोलापूर : जिल्हा परिषद (जि.प.) आणि ग्रामपंचायतींमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेनुसार संबंध आहे. जिल्हा परिषद हे उच्चस्तरीय आणि ग्रामपंचायत हे स्थानिक स्तरावरील शासन संस्था आहेत. स्थानिक स्तरावरील संस्थेवर (ग्रामपंचायत) निधी, मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत स्वतंत्र विभाग आहे, मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर दिशादर्शक ग्रामीण विकासाचा आत्मा (ग्रामपंचायत विभाग) दिसत नसल्याने आश्चर्याचा उत्तम नमुना म्हणून या फलकाकडे पाहिलं जाते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला निधी, मार्गदर्शन आणि मदतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या गावात विकास योजना राबवत असतात. ग्रामीण आरोग्य, जलसंधारण आणि पाणीपुरवठा यावरही जीपच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी कार्य केलं जातं. ग्रामपंचायतीचा थेट संबंध जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी येतो.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारती समोर या आठवड्यात दिशादर्शक डिजिटल बोर्ड उभारण्याचं काम सुरू आहे, ते काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं असून मुख्य इमारती तळमजला पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन विभागाची नावे लिहिण्यात आली आहे मात्र तळमजल्यावरील ग्रामपंचायत विभाग या दिशादर्शक फलकावर दाखविण्यात आल्याचे दिसत नाही, त्यामुळे हा विभाग बंद झाला की इतरत्र स्थलांतरित करण्यात आला, हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे.
पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. या तिन्ही स्तरांवर कामकाज करण्यासाठी वेगवेगळी अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत.
जिल्हा परिषद सोलापूर जिल्ह्यातील विकास योजना आणि कार्यक्रम राबवते, तर ग्रामपंचायती आपल्या गावांमध्ये विकासाचे काम करतात. जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना निधी पुरवते, तसेच मार्गदर्शन आणि मदत करते.
जिल्हा परिषद सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन करते, तसेच विविध योजना राबवते. ग्रामपंचायतींच्या कामांचे समन्वय ठेवण्याचे काम जिल्हा परिषद करते. ग्रामपंचायत आपल्या गावातील रस्ते,पाणी व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, इत्यादी. विकास योजना राबवते. या माध्यमातून ग्रामपंचायती आपल्या गावातील लोकांच्या समस्या सोडवतात.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर नव्याने उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर
जिल्हा परिषद सोलापूर
मुख्य प्रशासकीय इमारत
मुख्य इमारत तळमजला
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्ष
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्ष
सामान्य प्रशासन विभाग
अर्थ विभाग
कृषी विभाग
मुख्य इमारत पहिला मजला
पाणी व स्वच्छता विभाग
यशवंतराव चव्हाण सभागृह
माहिती व तंत्रज्ञान कक्ष
मुख्य इमारत दुसरा मजला
बांधकाम विभाग क्र. एक व दोन
ग्रामीण पाणी पुरवठा
जलसंधारण विभाग
शिवरत्न सभागृह
असा उल्लेख दिसतोय, मात्र त्यात ग्रामीण भागाचा आत्मा म्हणून गणला जात असलेला ग्रामपंचायत विभाग न दिसणे हे नवलाईचं उदाहरण म्हणून उद्या पाहिलं जाणार आहे.