...पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणांत आझाद एज्युकेशन फाऊंडेशनचा जल्लोष साजरा

shivrajya patra

सोलापूर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पहाटे भारतीय लष्कराने सीमेपलीकडे कारवाई केली. सकाळी ही बातमी कळताच जल्लोष करण्यासाठी हिंदू-मुस्लिम सोलापूरकर रस्त्यावर आले. बदला घेतल्याविषयी समाधान व्यक्त करत सैन्य दलाविषयी अभिमान व्यक्त करण्यात आला. अनेकांनी एकमेकांना मिठाई भरवली.आझाद एज्युकेशन फाऊंडेशनने सायंकाळी किडवाई चौकात जल्लोष साजरा केला.

शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यासह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत सैन्य कारवाईचे स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या हाती तिरंगा होता. मंगळवार पेठ पोलिस चौकी परिसर, विजापूर वेस परिसर, किडवाई चौक, मौलाली चौक, जी. एम. चौक आदी परिसरात जल्लोष करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता.

आझाद एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने सायंकाळी सात वाजता किडवाई चौकात मरकज मशिदीसमोर जल्लोष करण्यात आला. तरुणांच्या हाती तिरंगा होता. 'भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या. मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी संयोजक रियाज खरादी, सलमान मोमीन, हाजी रशीद पटेल, सलीम शेख, मुजीब शेख, मुफिज माघामी, शाहिद तांबोळी आदी उपस्थित होते.

To Top