
कुल जमाते तंजिम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परिस सुरेश गायकवाड, मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या कु. वैष्णवी राम गायकवाड, आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अबूबकर नदाफ यांचा सत्कार केएमसी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना ताहीर बेग होते.
यावेळी विचारपीठावर माजी प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल, निवृत्त पोलिस उपअधीक्षक इक्बाल शेख, गुणवंतांचे पालक अस्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, जेलरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहर अध्यक्ष मतीन बागवान आदींची उपस्थिती होती.
मागील दोन वर्षांपासून पाहतोय की, शहरात विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्यावतीने राबविले जातात; यातीलच एक आजचा कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी विचारातून कृतीतून एकोपा दाखवून दिला आहे. सोलापूर शहर हे एकात्मतेचा संदेश देणार शहर आहे, असंही पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, युवराज पवार, याकुब मंगलगिरी, अलिम सय्यद, समिऊल्लाह शेख, हसीब नदाफ, राजा बागवान, मुजीब सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, अजिज कोटी, लतिफ शाब्दी, वाहिद विजापूरे, हेमंत ढवळशंक, फय्याज बागवान, इम्तियाज कमिश्नर , फारुख मटके, इलियास आदिल, कासिम बेलिफ, वजाहत अ. सत्तार, म. शफीक रचभरे, राजू हुंडेकरी, मुबिन शेख आदी उपस्थित होते.
