Type Here to Get Search Results !

क्लास न लावता सई सारोळे हिने मिळविले यश

सोलापूर : येथील इंडियन मॉडेल स्कूलमधील विद्यार्थिनी, राजकुमार आणि पद्मिनी सारोळे यांची कन्या सई सारोळे हिने दहावीच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण घेऊन यश संपादन केले. 

इंडियन मॉडेल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. या गुणतालिकेत 90 टक्केच्यावर गुण असलेले 82 विद्यार्थी आहेत तर 90 टक्केच्या आसपास गुण असलेले 80 विद्यार्थी आहेत. हर्षदा कामती हिने 99.60 टक्के गुण प्राप्त करून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सई सारोळे हिने क्लास न लावता यश संपादन केले आहे. 

त्याबद्दल इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, संचालिका सायली जोशी, प्राचार्या सुजाता बुट्टे, वर्गशिक्षक जेऊरे, शिरशीकर यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.