Type Here to Get Search Results !

विमानतळावर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचं स्वागत

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे गुरुवारी, १७ एप्रिल रोजी खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते. दरम्यान अक्कलकोट-मैंदर्गी रोडवरील हेलिपॅड लँडिंग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी खासदार तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं स्वागत करत त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ' बाप माणूस ' पुस्तक, निळी शाल, लेखणी अन् पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.

रविवारी, २० एप्रिल रोजी सोलापुरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी होत असतात. त्याच अनुषंगाने तटकरेंचा हा सत्कार  करण्यात आला. 

याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, दिनेश आवटी, महादेव राठोड आदिसह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदींचे उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत आले होते.