सोलापूर : विकास सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला रिझर्व बँक ऑफ इंडियाची मान्यता मिळाली असून त्याच्या चेअरमनपदी सी.ए. राज मिणियार यांची निवड करण्यात आली.
सी.ए. सुनील माहेश्वरी ,सी.ए. सुभाष महेश, प्रा. प्रवीण बजाज, बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी, संचालक मनीष बलदवा असे इतर या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य असतील. या निवडीबद्दल संचालक मंडळात सर्व सदस्यांचं अभिनंदन करण्यात आलं.
मार्च 2025 अखेरपर्यंत बँकेच्या एकूण ठेवी 351 कोटी आहेत. कर्ज व्यवहार 208 कोटी असून बँकेस ढोबळ नफा एकूण रुपये 5 कोटी 82 लाख झालेला आहे. सतत 4 वर्षापासून बँकेचे NET NPA प्रमाण 0% आहे.
या प्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष राजगोपाल चंडक, संचालक मंडळाचे इतर सभासद व मॅनेजर पांडुरंग मंत्री उपस्थित होते.