जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे ज्येष्ठ नेते संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ सांगली जिल्हा अध्यक्ष व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करणारे आक्रमक नेते, धडाडीचे सहकारी व प्रगतशील शेतकरी तसेच साखर कारखानदार अशी समाजमनात ओळख असलेले इंजि शिवश्री विजयसिंह महाडिक यांनी आपल्या माध्यमातून शेकडो गरजवंतांना आर्थिक शैक्षणिक मदत केली.
बेरोजगारांना काम देऊन स्वतःच्या पायावर उभे केलंय. स्मृति शेष शिवश्री आर. आर. आबा पाटील यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मराठा सेवा संघ कार्यालय सांगली साठी जमीन मिळण्यासाठी तसेच पतसंस्था सुरू करण्यात इंजि विजयसिंह महाडिक यांचा मोठा वाटा होता. ते इस्लामपूर येथे स्थायिक झाले होते. येथेच निधन झाले.
स्मृति शेष शिवश्री इंजि. विजयसिंह महाडिक यांच्या पार्थिवावर आजच १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान त्यांच्या जन्मगावी येलूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
ही आकस्मिक मृत्यूची बातमी ऐकून मराठा समाज व अन्य बहुजन समाजातील असंख्य सहकारी दुःखात बुडाला आहे. सर्वच महाडिक कुटुंबियांच्या या दुःखात सहभागी आहेत. जिजाऊ सर्वांनाच सावरण्यासाठी बळ देवो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना ...
मराठा सेवा संघ व आमच्या खेडेकर कुटुंबियांच्या वतीने शिवश्री इंजि विजयसिंह महाडिक यांच्या पावन स्मृतींना भावपूर्ण शिवांजली या शब्दसुमनांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संवेदना व्यक्त केलीय.