सोलापूर : गायनाचा कार्यक्रम... कार्यक्रमात गाणं आणि गाण्यात नावाच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून उद्भवलेल्या मारहाणीत चौघे जखमी झाले. ही घटना देगांव नाका येथे मंगळवारी, रात्री १०.३० वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांकडं 14 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री देगाव नाका इथं मंडळाच्या वतीने भीम गीत गायनाचा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गायक गाणे दरम्यान नेहमी दिलीप फडतरे यांचे नावाचे गाणे म्हणत होते, त्या दरम्यान नंदित गायकवाड याने, आम्हीसुध्दा वर्गणी देतो, आमचे पण नाव गाण्या दरम्यान का घेत नाही, अशी विचारणा केली.
तेव्हा दिलीप फडतरे याने तुमचा काय संबंध नाही, असे म्हणून नंदित तसेच भाऊ रोनक व मयुर, भावजी अनिकेत रणसुरे यांना जमाव जमवून हाताने-लाथा-बुक्यांनी अन् लाकडाने सर्वाना मारहाण करून शिवीगाळ केली.
तसेच दिलीप फडतरे, कुणाल क्षीरसागर, ऋषीकेश फडतरे आणि सचिन फडतरे यांनी बाजुला पडलेला दगड घेवून रोनक गायकवाड व नंदित यांना मारहाण करून जखमी केले. दरम्यान नंदितचे भावजी अनिकेत यांना कुणाल यांने लोखंड रॉडने डाव्या खांद्यावर मारले. या गोंधळात नंदितच्या हातातील अर्ध्या तोळ्याचे दोन अंगठ्या गहाळ झाल्या असून एन. के. क्षीरसागर यानं मयूर यास यांच्या पाठीस चावा घेतला, असल्याची फिर्याद नंदित दत्तात्रय गायकवाड (वय-२७ वर्षे, रा- हब्बु वस्ती.) यांना फौजदार चावडी पोलिसांकडे दाखल केली.
त्यानुसार दिलीप फडतरे, एन. के. क्षीरसागर, कुणाल क्षीरसागर, चंदन क्षीरसागर, ऋषीकेश फडतरे, सचिन फडतरे, बलभिम फडतरे, अशोक फडतरे, रतिकांत क्षीरसागर (सर्व रा- हब्बु वस्ती देगाव नाका, सोलापूर) आणि अन्य अनोळखी चार-पाच साथीदारांविरूध्द बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पाटोळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.