कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातंर्गत सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे सन 2025-26 मधील कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाची तुकडी क्र. 1 चे पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने, यांनी केले. या प्रशिक्षणाची तुकडी, 21 ते 25 एप्रिल या कालावधीत संपन्न झालेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले. 

याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांमधून वसंत व्हनमाने, (रा. गोटेवाडी) तसेच प्रविण जगताप (रा. सोहाळे) यांनी या प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार निर्मितीसाठी कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर असून याबाबत सखोल असं मार्गदर्शन मिळाल्याबाबत आभार व्यक्त केले. 

सधन कुक्कुट विकास गट चे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा विषद केली. या प्रशिक्षणास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

तरी पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशुपालकांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळण्यासाठी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी गट-अ डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी केलं आहे.

To Top