मातोश्री स्व. शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरजूंसाठी छत्र्यांचं वाटप

shivrajya patra

सोलापूर : मातोश्री स्व. शोभा गुरुनाथ माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील सिद्धेश्वर मंदिर, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल, परिसरातील अनाथ-बेघर, अनवाणी फिरणाऱ्या गरजवंतांना, ऊन-पावसापासून संरक्षण मिळावं, यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत छत्र्यांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. 

यावेळी  जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, DK मागासवर्गीय संस्थेचे गौतम कसबे, शिवसेना दक्षिण प्रमुख सखाराम वाघ, किशोर चौधरी, कासेगांव तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार,मुस्ती तंटामुक्त  अध्यक्ष गौतम चौधरी, गुड्डू निर्मल, अशोक जाधव, संभाजी माने, बबन डिंगणे, महेश साबळे, निरंजन बारशिंगे, लक्ष्मण राऊत, विजय राऊत, लक्ष्मण बार्शीकर आदी उपस्थित होते.

To Top