Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात अडीच लाख शेतकरी सोलार पंपच्या प्रतिक्षेत; राष्ट्रीय किसान मोर्चाची आकडेवारी

सोलारच्या सक्तीच्या विरोधात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय किसान मोर्चा शी संपर्क : अभय रंगारी

भंडारा : उन्हाच्या झळा वाढत असताना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतो. शेतकरी एप्रिल मे जून या महिन्यातच पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवते, म्हणून त्याचा बोअर .. त्यानंतर महावितरणची लाईट ... ती नाही म्हणून सोलार चा पर्याय दाखविला जातो.  शेतकऱ्यांनी सोलार पंप साठी अर्ज केले आहेत, त्यांना वेळेत सोलर पंप उपलब्ध होत नाहीत. ते काम अतिशय संथ गतीने चालू आहे. सध्या महाराष्ट्रात अडीच लाख शेतकरी सोलार पंपच्या प्रतिक्षेत असल्याचं  राष्ट्रीय किसान मोर्चा, जिल्हाध्यक्ष अभय डी. रंगारी यांनी म्हटलं आहे.

वीज टंचाईवर उपाय म्हणून सध्या महावितरण कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सोलार पंपची सक्ती केली जात आहे. ज्यांनी नवीन विहीर घेतली आहे किंवा नवीन बोअर घेतले, त्यांना वीज कनेक्शनची मागणी केल्यानंतर वीज कनेक्शन बंद झाले आहेत, असे महावितरणमार्फत तोंडी सांगितले जात आहे. त्यांना नवीन वीज कनेक्शन दिले जात नाही. हे एक ग्राहक म्हणून ग्राहकाच्या/शेतकऱ्याच्या हक्काचे उल्लंघन करणारे आहे, असे भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांनी म्हटलं आहे.

सोलार पंपला काही मर्यादा आहेत. ज्यांचे बोअर ५०० फुटापेक्षा खोल आहे, ज्यांची शेतातील पाइपलाइन हजार-दोन हजार फूट आहे, अशा शेतकऱ्यांना सोलार पंप कामाचा नाही. तसेच सरासरी ५ HP साठी ३५,००० रूपये सोलार साठी मोजावे लागत आहेत. या अगोदर महावितरणचे ५ HP साठी फक्त ११,००० रु डिमांड होते. तसेच सोलार कंपनी फक्त ५ वर्षाची वॉरंटी देत आहे. त्यांनतर सर्व मेंटन्स शेतकऱ्यांच्या माथी असणार आहे.

सध्या मराठवाड्यातील अनेक शेतकरी एप्रिल महिन्यात शेतात बोअरवेल घेत आहेत. लाख दोन लाख खर्च करून पाणी उपलब्ध होत आहे. पण महावितरण म्हणते डिमांड बंद आहे. आता या शेतकऱ्यांनी काय करायचं ? असा राष्ट्रीय किसान मोर्चा चा सवाल आहे.

आजमितीला शेतकरी वीज वितरण कंपनी, शासन आणि प्रशासन यांच्या कपटी नीती चा  बळी ठरत आहे. महावितरणच्या सोलार पंप सक्तीच्या धोरणाला शेतकरी त्रस्त झाले आहेत. परेशान झाले आहेत. अशा शेतकऱ्यांनी जर संघटित होऊन आवाज उठवला तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. अशा त्रस्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय किसान मोर्चा संघटनेशी संपर्क करावा, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे (मो.नं. 9764052511) आणि भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी (मो. नं. 9764166324) यांनी केलं आहे.