धामोरी/प्रतिनिधी: येवला तालुक्यातील अनकुटे येथील रहिवासी लक्ष्मण मोतीराम तळेकर यांचं नुकतेच अपघाती निधन झाले. ते मृत्यू समयी ४२ वर्षीय होते. त्यांच्या पश्चात आई-वडिल,पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार आहे.
धामोरी येथील उद्योजक जय जनार्दन हार्डवेअर ॲड ईलेक्टिकल दुकानचे मालक श्रावण तळेकर यांचे ते पुतणे होत. त्यांच्या अपघाती निधनाने अनकुटे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.