Type Here to Get Search Results !

25 एप्रिल रोजी "जागेवर निवड संधी"

 

सोलापूर/17: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील मॉडल करिअर सेंटर येथे शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वा. पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांकरीता "जागेवर निवड संधी"  चे आयोजन करण्यात येणार असून, सदर "जागेवर निवड संधी" (PLACEMENT DRIVE) मध्ये जिल्हयातील कीया मोटर्स, सोलापूर आणि किरण एन्टरप्राईसेस, सोलापूर हे उद्योजक सहभागी होऊन, प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत. या "जागेवर निवड संधी" (PLACEMENT DRIVE) मध्ये आय. टी. आय. प्रकारच्या शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना जागेवर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करुन  वरील ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देण्यात याव्या, तसेच www.ncs.gov.in या वेबसाईटवर जास्तीत जास्त उमेदवांनी सहभाग नोंदवावा व संधीचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 0217-2992956 या क्रमांकावर साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर श्रीमती संगीता खंदारे यांनी केलं आहे.