महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी ग्रामदैवत सिध्देश्वर चरणी साकडे

shivrajya patra

सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे यांचा उपक्रम

सोलापूर : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रायगड येथील त्यांचे निवासस्थानी अनेकांनी समक्ष भेट घेऊन अदितींना शुभेच्छा दिल्या.

अल्पावधीतच राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी  बहीण योजनेचा लाभ घेता आला. त्यामुळे आज प्रत्येक महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज चरणी आदिती यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात आले. त्यांच्या नावाने संकल्प सोडण्यात आला. 

याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यामुळे अनेक महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी, महिलांनी मंत्री आदिती यांच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी केलं होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष वैभव गंगणे यांनी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महाआरतीचे आयोजन करून मंत्री  आदिती यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले, यावेळी त्यांनी आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत मंत्री आदिती तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवती विभाग अध्यक्ष किरण माशाळकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, समदानी मत्तेखाने, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके, उमादेवी झाडबुके, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे सचिन चलवादी,आशिष म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

To Top