Type Here to Get Search Results !

पार्श्वगायिका सपना अवस्थी भारतीय कला गौरव पुरस्काराने सम्मानित


सोलापूर : मोहम्मद अयाज संचलित भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे मुंबई बॉलीवूड च्या पार्श्वगायिका सपना अवस्थी यांना भारतीय कला गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आला. सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करुन सपना अवस्थी यांना सन्मानित करण्यात आले. 

सपना अवस्थी यांनी आपल्या सुमधूर आवाजात भारतीय फिल्म जगतामध्ये अनेक अविस्मरणीय गाणी गायिली आहेत. 'परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोडके' (राजा हिन्दुस्तानी), 'चल छैंया छैंया छैंया (दिल से), 'कभी बंधन जुडा लिया (हम तुम्हारे हैं सनम), मै आई हूं युपी बिहार लुटने, बन्नो तेरी अंखियां सुरमेदानी अशा अनेक सुपरहिट गीते गाऊन चित्रपट सृष्टीत योगदान दिल्याबद्दल पार्श्वगायिका सपना अवस्थी भारतीय कला गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. 

यापूर्वी उषा मंगेशकर, हेमलता, राधा मंगेशकर, वर्षा उसगांवकर, दीपाली सयद, कविता पौडवाल यांना भारतीय कला गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आलंय. हा सन्मान सोहळा सोमवारी, ४ नोव्हेंबर रोजी हॉटेल सुर्या एक्झिक्युटिव्ह येथे पार पडला.

यावेळी गायक मोहम्मद अयाज, अपर जिलाधिकारी मोनिका सिंह, पंखुड़ी अवस्थी, आकीब शेख, अमन शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

फोटो ओळी : अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पार्श्व गायिका सपना अवस्थी गायक मोहम्मद अयाज आणि अन्य छायाचित्रात दिसत आहेत.