Type Here to Get Search Results !

समित कक्कड दिग्दर्शित अॅक्शनपॅक्ड ‘ रानटी ' शुक्रवारी सिनेरसिकांच्या भेटीस

दक्षिणेतील अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव यांचं मराठी सिनेसृष्टीत  पदार्पण 

सोलापूर : साचाबध्द मांडणीची चौकट ओलांडून मराठी सिनेसृष्टी कुस बदलतेय,असं दिसतंय. नेहमी वेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देत आलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेरसिकांसाठी मोठा अ‍ॅक्शनपट घेऊन आले आहेत. त्यांचा 'रानटी' हा चित्रपट शुक्रवारी,२२ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. अभिनेते शरद केळकर यांच्या समवेत दक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव यांचं मराठी सिनेसृटीतलं पदार्पण रसिकांसाठी पर्वणी ठरेल, असं दिग्दर्शक समित कक्कड यांनी म्हटलंय. 


कोणत्याही कथाविषयाचं अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर प्रभावीपणे सादर करायचं,हे समित यांच्या यशाचं गमक असल्याचं आजवरच्या त्यांच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे दिसून येतं.

दिग्दर्शक समित कक्कड यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय हाताळण्याची शैली मराठी सिनेरसिकांनी तसंच सिनेसृष्टीनं पाहिलीय. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’  हा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  


काही मोजके अॅक्शनपट सोडले तर अॅक्शन मसाल्यासाठी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला अॅक्शनचा तडका देण्यासाठी मी 'रानटी' हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत घेऊन आल्याचं दिग्दर्शक समित कक्कड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

मराठीत मोठ्या पडद्यावर आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस्  या अॅक्शपटात पहायला मिळणार आहेत. 'रानटी' वैशिष्ट्य असं की, अभिनेते शरद केळकर यांच्या सोबत साऊथ फिल्म इंडस्ट्रीत जवळपास १९ चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप ठेवलेल्या सानवी श्रीवास्तव हा नवा चेहरा पहायला मिळतोय.


'रानटी' चित्रपटात प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव  देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, शान्वी श्रीवास्तव, नयना मुखे असे तगड्या अशा एक ना अनेक कलाकारांनी आपापल्या भूमिकांना सारी ताकद खर्ची टाकत न्याय दिलाय. 

हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॉवरफुल पॅकेज आहे.अॅक्शन,रोमान्स, इमोशन,ड्रामा ही 'रानटी' चे विविध पैलू आहेत. यावेळी या चित्रपटातील 'एक नंबर... 'या गीताचंही लाँचिंग करण्यात आलं. 'रानटी ‘ ला अजित परब यांचं संगित लाभलंय. 

हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलीय. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीचा मानकरी ठरेल.’ असा विश्वास समित कक्कड यांनी शेवटी व्यक्त केलाय.