सोलापूर : येथील विमानतळाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नागनाथ नगरातील एका घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरिक्षक महादेव राऊत आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी छापा टाकून ०२ पिडीतांची मुक्तता केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे छापा टाकण्यासाठी पोलीस निरिक्षक राऊत आणि पोलीस अंमलदारांनी त्या ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून बोगस गिऱ्हाईक पाठवून बातमीची खात्री झाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. कुंटणखाना चालविणारी महिला उषा बापू बनसोडे (वय-३४ वर्षे, रा. नागनाथ नगर, विमानतळाचे पाठीमागील बाजूस, सोलापूर) आणि एका एजंटास ताब्यात घेण्यात आले.
उषा बापू बनसोडे आणि एजंट राहूल खाजप्पा अण्णारेड्डी (वय -२५ वर्षे, रा. प्लॉट नंबर ३२, कोंचीकरवी गल्ली, दुर्गादेवी मंदीरजवळ सोलापूर) यांनी पिडीत ०२ महिलांची पिळवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यांच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजिविका करीत असताना मिळून आले.
या आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भादविसंक. ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे तपासासाठी, २० नोव्हेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.पोलीस निरिक्षक महादेव राऊत
या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील मपोसई नशिपून शेख, स.फौ. राजेंद्र बंडगर, स.फौ. हेमंत मंठाळकर, पोहेकॉ/८४६ महादेव बंडगर, पोना/७७० अ.सत्तार पटेल, मपोहकॉ/९२९ मुजावर, मपोहेकॉ/०७ अकिला नदाफ, मपोना/१७०४ वैशाली बांबळे व चालक पोकॉ/१५४१ स्वप्नील मोरे यांनी शिताफीने कामगिरी करून छापा यशस्वी केला.
................ चौकट .........
... अशाच पध्दतीने यापुढेही होणार कारवाई
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पध्दतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतुक प्रतिंबंध कक्ष, सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटनखाने बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.