कळमनुरी : बोल्डा (जिल्हा : हिंगोली) येथील सामाजिक कार्यकर्ते शेख जानी शेख नबीसाहाब यांचे नुकतेच हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मृत्यू समय ७५ वर्षांचे होते. सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणारं व्यक्तिमत्व अशी त्यांचे जनमानसात ओळख होती.
नेहमी गावाच्या विकासासाठी धडपड करणारा नेता, निर्भीडपणे अधिकारी, राजकीय नेत्यासमोर गावाचे प्रश्न मांडणारे म्हणून जनमानसात त्यांची प्रतिमा होती. त्यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
साहित्य व शिक्षणप्रेमी म्हणून शेख जानीभाई बोल्डेकर यांची विशेष ओळख होती. या श्रध्दांजली कार्यक्रमाला शेख निजाम गवंडगावकर, शेख खम़र हदगावकर, शेख नुर मोहम्मद, शेख जाफरसाब चिखलीकर, जाफर आदमपूरकर , प्रा. महेश मोरे, प्रा.शेख लतीफ, डाॅ. सय्यद जब्बार पटेल, प्रा. डाॅ. विजय विणकर आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुप्रसिध्द मुस्लिम मराठी साहित्यिक शेख शफी बोल्डेकर, शिक्षक शेख निसार आणि शेख लतीफ यांचे वडील होत.