सोलापूर : मनोज जरांगे-पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांनी पातळी ओलांडून केलेल्या टीकेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने शनिवारी, छगन भुजबळ यांचा प्रतीकात्मक पुतळा बनवत त्यांना बेड्या घालत पिठलं भाकरी खाऊ घालण्याचं आंदोलन केलं.
अंबड येथील ओबीसी सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्या आरोपीची पातळी सोडून खालच्या पातळी जाऊन मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली. त्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी जुळे सोलापुरात मराठा समाज अन् संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली.
मराठा समाज अन् संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छगन भुजबळांच्या विरोधात आंदोलन करताना, भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्यांच्या हातात बेड्या घालून, त्यांना पिटलं-भाकरी खाऊ घालत त्यांच्या निषेधात घोषणा दिल्या. मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये जुळे सोलापूर येथील मराठा समाजाने अनोख्या पद्धतीने आंदोलन झाले.
एका मुलाला कारागृहातील कच्च्या कैद्याचा पोशाख घालून आणि छगन भुजबळ यांचा मुखवटा घालून प्रतिकात्मक छगन भुजबळ उभा करून त्यांच्या हातात बेड्या आणि एक ताट देऊन त्यामध्ये झुणका भाकरी ते खाद्य देऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी घोषणाबाजी देऊन आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शांतता प्रिय राज्य असून महाराष्ट्रातील शांतता व ऐक्य बिघडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली छगन भुजबळ हे महाराष्ट्रभर करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.