श्री उज्जैन जगद्गुरूंचा पीठारोहण द्वादशवार्षिक महोत्सव
वाराणसी : तीर्थक्षेत्र रामेश्वर येथे श्रीजगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन काशी महापीठाच्यावतीने मठ व यात्रिक निवासाचे भूमिपूजन रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.
वीरशैव समाजाच्या कल्याणासाठी, यात्रिकांना निवास व महाप्रसाद व्यवस्था करण्याच्या उद्देशाने रामेश्वर येथे भूमिपूजन समारंभ श्री उज्जैन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्री श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात, खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाथ संस्थानचे गुरुबाबा महाराज औसेकर (औसा), कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री एस. ईश्वरप्पा, बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन वीरण्णा चरंतीमठ (बागलकोट), आ. विजयकुमार देशमुख (सोलापूर), आ. जगदीश गुडुगुटीमठ (जमखंडी), आ. सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), माजी आमदार बसवराज पाटील (मुरुम), माजी आमदार विश्वनाथ चाकोते, उद्योगपती रामुसेठ हेबळ्ळी (अंबरनाथ), विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिल गाडवे (पुणे), विश्वेश्वर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी (पुणे), जयंतकुमार (बंगलोर), जगदेव हिरेमठ (हैदराबाद), गुड्डापूर दानम्मादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ (सोलापूर), सुभाष चौकवाले (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
समारंभ सर्व प्रांतातील शिवाचार्य व हर गुरू चरमूर्ती, स्वामी रामदेव, पतंजली योग विद्यापीठ हरिद्वार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. वैदिकत्व वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री (नंदी वड्डेमान), वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ (सोलापूर), वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ (सोलापूर), वेदमूर्ती महालिंग शास्त्री, वेदमूर्ती लोकेश आराध्य (शिवमोग्गा बिसनहल्ली), गदग व शादनगर पाठशाळेचे वैदिकवृंद करणार आहेत. तत्पूर्वी शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी धनुष्कोडी येथे पंचपीठाधीश्वरांचे समुद्रस्नान होणार आहे.
यावेळी श्री उज्जैन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचा पीठारोहण द्वादशवार्षिक महोत्सव संपन्न होणार आहे. यानिमित्त रामेश्वर येथे धर्मसभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास देशभरातील शाखामठ शिवाचार्य, महादानी, राजकीय मान्यवर व्यक्ती व वैदिक विद्वांनांचे आगमन होणार आहे. तरी सर्व सद्भक्तांनी जास्तीजास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन श्रीकाशीपीठाच्या वतीने करण्यात आले आहे.