स्थळ ः अथर्व गार्डन
घोंगडे वस्तीजवळ, सोलापूर
कार्यक्रमाची वेळ : सकाळी ११ वाजता
सोलापूर : भारतीय संस्कृती ही सण-उत्सवाने परिपूर्ण आहे. इथं वर्षेंवर्षे वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात पण एक दिवाळी असा सण आहे जिथे लोक वर्षापासून तयारी करतात जस की एखादी महाग वस्तू खरेदी,सोनं खरेदी किंवा कपडे खरेदी, निमित्त असते, ही दिवाळी, ' तिमिराकडून तेजाकडे नेणारी दिवाळी ! दिवाळीची वाट बघतात. आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे साजरी केलीय, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी वंचितांसोबत साजरी करण्यात आलीय.
सरकारी कर्मचारी असो वा खासगी, अगदी बिगारी काम करणारा बिगारी देखील दिवाळी सणाची आतुरतेने वाट बघतात. व्यापारी वर्गास ही दिवाळी आनंद देऊन जाते, परंतु समाजातला असा एक घटक आहे, ज्याला स्वतःच पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो.तिथं दिवाळीत अभ्यंग स्नान, नवे कपडे, फराळ, भर आहेर ह्या गोष्टी तर दुरच... !
हीच उणिव लक्षात घेऊन आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेला जाणवली. त्यातूनच आस्था रोटी बॅंकेचा 'दिपावली वंचितांसोबत' हा आनंद सोहळा पूर्णत्वास आला.
प्रथम रस्त्यावरिल भिक्षुकांना दिवाळीतील अभ्यंग स्नान,
त्यांना नवीन कपडे वाटप, औक्षण मुख्य कार्यक्रमासाठी सभामंडपात बैठक व्यवस्था, मान्यवरांचं स्वागत, मनोगत, वंचितांना, ज्येष्ठ अन् अनाथ बालकांना नवीन कापडे वाटप, फराळ वाटप अशी या कार्यक्रमाचं स्वरूप होतं.
डॉ. शिवरत्न शेटे शिवचरित्र व्याख्याते, बाळासाहेब वाघमारे, डाॕ.सोनाली घोंगडे, अॅड.निता मंकणी, राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे, अमित कांबळे, वैशाली सुरवसे, विजया सुरवसे, सुरेश बाबू मंकणी, योगेश कुंदुर, श्याम पाटील इत्यादींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुरेश पाटील होते.
शिवचरित्राचे अभ्यासात तथा व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी कार्यक्रमाच्या वातावरणात दानत्त्वाचं महत्त्व विशद करताना, सोलापुरातील विविध महापुरुषांच्या या पावन भुमीत समाजसेवेचे संघटन सोलापुरातच बीज रोवल गेलं. आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेमुळे आज अशा वंचितांना कोणी अंध आहे, कोणी अपंग, कोणी निराधार, ज्येष्ठ त्यांच्या चेहऱ्यावर जो खरा आनंद दिसतोय, ते केवळ आस्था रोटी बँकेमुळेच, समाजातील हा वंचित वर्ग ज्यांनी एकदाही घरावर आकाशदिवे लावले नाहीत, तिथे ह्या संस्थेने आकाश दिवा लावून दारी पणत्या व दिवाळीसाठी शिधा वाटप करुन दिवाळी साजरी केली, खरच धन्यता वाटते, आस्था नावातच सर्व सार आहे, असंही त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे संयोजक विजय छंचुरे, सौ.संगिता छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, अनिता तालीकोटी, कल्पना कोळी, गीता भोसले, स्नेहा वनक्रुद्रे, स्नेहा मेहता, आकाश तालीकोटी, विघा माने, मंगल पांढरे, सुरेखा पाटील, सोलापूरकर, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
साधारणपणे कार्यक्रमासाठी आलेल्या अंध-अपंग, कुष्ठ रोगी असे २००/३०० वंचितांना मोफत नवे कपडे फराळ वाटप केले गेले तर ७०० लोकांना फराळ पॉकेटस् चं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वनक्रुद्रे यांनी केले तर पुष्कर पुकाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
...... ..... चौकट .........
... आजच्या युगात सोलापुरातील कर्णाचा अवतार : सुरेश पाटील
आस्था रोटी फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बॕकेच्या विजय छंचुरे सरांना कर्णाचा अवताराची उपमा दिली. महाभारतात कर्ण ला दानशूर म्हणून ओळखले जाते. आजच्या युगात सोलापुरातील दानशूर कर्णाचा अवतार म्हटले तर वावगे ठरणार नाही, असं माजी नगरसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हटले.