Type Here to Get Search Results !

ग्रामीण पोलीस दलातर्फे मोहंम्मद अयाज यांचा सन्मान




सोलापूर : पोलीस महानिरीक्षक माननीय सुहास फुलारी यांच्या हस्ते गायक मोहंम्मद अयाज यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे हा सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधीक्षक विजया कु्र्री, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह अन्य अधिकारी व पोलीस परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मोहंम्मद अयाज दिपावलीच्या आनंद संध्या कार्यक्रमांत एक पोलीस परीवाराची सेवा म्हणून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. मोहंम्मद अयाज गेली अनेक वर्षे झाली पोलीस परीवारसाठी अनेक संगीत कार्यक्रम राबविले आहेत. यावेळी सुद्धा आवर्जून 'दिपावली स्नेह मेळावा २०२३ संगीत संध्या' चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खास करुन सोलापूर ग्रामीण पोलीस परिवारासाठी होता. या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास फुलारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

छायाचित्रात पोलीस महानिरीक्षक सुहास फुलारी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपअधीक्षक विजया कु्र्री दिसत आहेत.