सोलापूर : भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना यंदाची दिवाळी पालावरती जाऊन साजरी करण्याचं आवाहन केलं होतं, त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून येथील जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी वंचित, गरजू, वयोवृद्ध, दिव्यांग अशा लोकांपर्यंत पोहोचून गांधी नगरात पालावरती एक दिवा वंचितांसाठी उपक्रम राबवला.
जनआधार फाऊंडेननचे संस्थापक आनंद गोसकी महेश दासी, ऋषिकेश चिलवेरी, अमोल गांगजी, श्रुतिन बोड्डू, मेघना बोड्डु यांच्या प्रमुख उपस्थित पालावरील गरजूंना मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी जनआधार फाऊंडेशनच्या कार्याला श्रीकांत येमुल, सतिश रच्चा, कृष्णाहरी मामड्याल, कमलेश गोसकी, श्रीनिवास चिंता, मोहन कनकी, पद्मा नुति, श्रीनिवास मंगलपल्ली, सिद्राम चिलवेरी, योगेश येमुल, नागेश वंगा, मनोहर नल्ला यांचं सहकार्य लाभले.