सावधान ... ! गोड ऐकण्यात डोकेंची झाली; आपलीही होऊ शकते, ऑनलाइन फसवणूक... !

shivrajya patra
सोलापूर : सावधान... ! गोड ऐकण्यात डोकेंची झाली, आपलीही होऊ शकते, ऑनलाइन फसवणूक... ! एका महिलेने फोन करून, मी DBS super card visa मधून बोलत आहे, तुम्ही सदर कार्डचा वापर का करत नाही, असे विचारले, तुमचे कार्डची वार्षिक फी जास्त आहे, म्हणून तुमचे कार्ड वापरत नाही, डोके यांनी सांगितले. त्यावर आम्ही तुम्हाला कंपनीकडून सर्व चार्जेस फ्री देत आहोत, असे म्हटल्यावर, तिने दिलेल्या सादेला विमा कंपनीचे प्रतिनिधी डोके यांनी प्रतिसाद दिल्याने, त्यांच्या कार्डवर ९१ हजारांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आलीय, अशाच पद्धतीने अविनाश नंदकुमार लोंढे यांचीही जवळपास ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, न्यु इंडिया इंन्शुरन्स विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद महादेव डोके (वय - ४८ वर्षे, रा- बी/७८ इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी DBS super card visa  घेतले होते, मात्र त्याचे चार्जेस अधिक असल्याने ते कार्ड वापरत नव्हते. त्याच कार्ड कंपनीकडून बोलतेय, असा एक कॉल ९०४०९२२४२४ या मोबाईल क्रमांकावरुन प्रमोद डोके यांना आला. ती अनोळखी महिला,DBS super card visa  संबंधी बोलते यावर विश्वास ठेवून, प्रमोद डोके यांनी तिने विचारलेली सर्व माहिती देत ओटीपी क्रमांक ही दिला. तो कॉल खंडित झाल्यावर काही क्षणात DBS super card visa कंपनीकडून आपल्या क्रेडिट कार्डवर मोठे ट्रांजेक्शन झाले आहे किंवा कसे अशी विचार ना करणारा फोन आला.

त्यावेळी प्रमोद डोके यांनी, त्यांना मी कोणतेही ट्राक्झेशन केले नाही, असे म्हणाल्यावर कंपनीने फिर्यादीस रितसर तक्रार दाखल करण्यास सांगितले. हा प्रकार ०८ जून २०२३ रोजी पहाटे १२.५० वा. घडला. या संबंधी मोबाईलवर ९१६७४.६९ रूपये कट झाल्याचे दोन टेक्स मेसेज आले.

अशाच पद्धतीने अविनाश नंदकुमार लोंढे (रा. टिक्केकरवाडी, ता.उत्तर सोलापूर) यांची बजाज फायन्सास चे DBS super card visa क्रेडिट कार्ड हे लाईफ टाईम फ्री चार्जेस करून देतो, असे म्हणून अनोळखी मो. क्र. ८१७१५१५७६२ धारकाने फोन करून लोंढे यांचा विश्वास संपादन करून लोंढे यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मेसेज पाठवून ३१ मे २०२३ रोजी ५०,९०० रूपयाची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी उपरोक्त क्रमांकाच्या मोबाईल धारकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचवरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top