कु. श्रावणी शिंदे या विद्यार्थीनीची विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

shivrajya patra


सोलापूर : क्रीडा संकुल कुमठा नाका, सोलापूर येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी झालेल्या शालेय तलवारबाजी २०२३-२४ स्पर्धेत वयोगट १७ मध्ये कु. श्रावणी दीपक शिंदे हिने ईपी प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या घवघवीत यशामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. 
क्रीडा व युवक संचलनालय, पुणे विभाग अंतर्गत सोलापूर क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर ,जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा तलवारबाजी असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०३३-२४ चे आयोजन क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. वयोगट १७ वर्ष मध्ये तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेत ईपी या प्रकारात कु. श्रावणी दीपक शिंदे हिने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. 
याप्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश नीळ यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ग्रामीण भागातून तलवारबाजीच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड होणारी श्रावणी शिंदे ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिने भविष्यात अशा प्रकारचे यश सतत मिळवावे.अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थी भाग घेतील. यश संपादन करतील. 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक गणेश निळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य सुषमा निळ, प्रा. तेजश्री कुलकर्णी, क्रीडा शिक्षक दिलीप भोसले उपस्थित होते.
To Top