पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी संजय साळुंखे यांची निवड

shivrajya patra


सोलापूर :पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोलापूर या मंडळाची सभा मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.०० वा. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथे संस्थापक अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त पांडुरंग दिड्डी, रामचंद्र जन्नू, विष्णु कारमपुरी, विजय गुल्लापल्ली, विनोद देविदास, अजय दासरी, सुरेश फलमारी, उमेश मामड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेत पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  अध्यक्षपदी संजय नामदेव साळुंखे यांची निवड करण्यात आली.
 सन २०२३-२४ सालाकरिता उत्सव समिती खालील प्रमाणे निवड केली. कार्याध्यक्ष आशुतोष दंडी, संदिप महाले उपाध्यक्ष - अजय गवनी, सुरेश यल्लारम, कालीदास काळपगार, योगेश मार्गम, अविनाश मंगलपल्ली, सचिव अक्षय अंजीखाने, सहचिटणीस शेखर वडलाकोंडा, संदिप फत्तेपूरकर, राहूल एकबोटे, करण साळुंखे, विनोद मुत्याल, खजिनदार - अनिल वंगारी, सहखजिनदार नागेश मंजेली, किरण वल्लाल यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत प्रसिध्दी प्रमुख - रोहन श्रीराम, स्वयंसेवक प्रमुख चैतन्य जिंदम, सौरभ बिंगी, मिरवणूक प्रमुख - विश्वनाथ दुर्लेकर, प्रविण कांबळे कार्यालय प्रमुख व्यंकटेश आकेन, पुरोहित अरविंद जिल्ला, ताता गणपती प्रमुख अंबादास आदेली, सागर कारमपुरी, कार्यकारणी सदस्य नागेश म्याकल असे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
To Top