'दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार' च्या मानकरी वहिदा रहमान यांचं 'यांनी' केले अभिनंदन

shivrajya patra
मुंबई : 
भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल व उत्कृष्ट अशा अभिनयाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचं हार्दिक अभिनंदन केलंय.

हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी वहिदाजी यांची नेहमीच प्रेक्षकांनी प्रशंसा केली, त्यापैकी काही महत्त्वाचे सिनेमे म्हणजे 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौधवी का चाँद', 'साहेब बीवी और गुलाम', 'गाइड', 'खामोशी' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना त्यांच्या दिलखुलास अभिनयाने नेहमीच प्रेरित केले, अशा शब्दात ज्येष्ठ नेते पवार यांनी आपले ट्विटर हँडलवर त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या अविस्मरणीय प्रवास अन् वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला.

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त वहिदाजी या भारतीय नारीचे समर्पण, वचनबद्धता आणि सामर्थ्याचे उदाहरण आहेत, वहिदाजी यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल पुनश्चः अभिनंदन ! असंही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत लिहिलं आहे.
To Top