जिल्ह्यातील २४ घरफोडी, ०२ चोरीचे गुन्हे उघड, १५ लाख ५८ हजार ५९० रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

shivrajya patra

सोलापूर : मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या तिन्ही तपास पथकांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेकामी भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये २४ घरफोडी व २ चोरी असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात ५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यामध्ये १५ लाख ५८ हजार ५९० रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिणे, मोबाईल, कॅमेरा व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्ह्यामध्ये घडणारे मालाविषयी गुन्ह्यांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स कोणी धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक आरोपी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली होती.

त्यानुसार या पथकाने गोपाळपूर येथे सापळा लावून त्या आरोपी चंद्रकांत मधुकर चव्हाण (वय वर्ष - २७, राहणार गोपाळपूर) याला ताब्यात घेतले. त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी मंगळवेढा सांगोला पंढरपूर शहर पंढरपूर तालुका करकंब टेंभुर्णी व माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीचे १६ गुन्हे त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १५ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली होती. त्याच्या ताब्यातून २३० ग्रॅम सोन्याचे दागिने ३५० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ०८ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, असल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणि गुन्हे शाखेच्या सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकाने वेळापूर पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करताना घराचे बांधकाम करण्यासाठी पूर्वी आलेल्या भारत पोपट साठे (वय वर्षे- ३८, राहणार बोरगाव, तालुका माळशिरस) याच्यावर संशय असल्याचे फिर्यादीने सांगितले होते. त्यानुसार भारत साठे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्य पूर्ण तपास करताना त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने दहा चांदीचे बार व मोटरसायकल असा एकूण ५ लाख ३३ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुन्हा घडल्यापासून केवळ दहा दिवसाच्या सपोनि शेळके व त्यांच्या पथकाने तपास करून उघडकीस आणला, या गुन्ह्यातील 100% मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांच्या पथकाने पंढरपूर उपविभागामध्ये झालेल्या माला विषयीच्या गुन्ह्यांचा विस्तृत व बारकाईने विश्लेषण केले असता बऱ्याच गुन्ह्यांमध्ये गुन्हे करण्याची कार्यपद्धती एकाच प्रकारची असल्याचे लक्षात घेऊन हे गुन्हे पंढरपुरातील सुरज मकरध्वज पवार व त्याच्या दोन साथीदारांनी केले असल्याचे तपासात पुढे आले.
सुरज मकरध्वज पवार याच्याकडे कसून चौकशी करता, त्याने त्याच्या साथीदारासह पंढरपूर शहर पंढरपूर तालुका पंढरपूर ग्रामीण मधील ०९ गुन्ह्यांची कबुली दिली, त्याच्या ताब्यातून ०१ लाख ९१ हजार २९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी तिन्ही पथकांच्या कामगिरीबद्दल अभिनंदनही केले.

या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे,  सपोनि शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे आणि त्यांच्या पथकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

.........................
स्थानिक गुन्हे शाखेची
या वर्षातील कामगिरी

सन २०२३ मध्ये आज अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मालाविषयीचे ०१ दरोडा, ०५ जबरी चोरी, ७३ घरफोडी आणि ४४ चोरीचे असे एकूण ११७ गुन्हे उघडकीस आणून ०१ कोटी,०५ लाख, ६८ हजार, ७६९ रु. चा मुद्देमाल जप्त केला.

.................

...यांनी पार पाडली ही कामगिरी !

सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि/धनंजय पोरे यांच्या पथकातील सपोफी/ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर पोहेकॉ/परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोकॉ/विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे. तर सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकातील पोसई राजेश गायकवाड, सहाफौ नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनाजी गाडे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते समीर शेख यांनी पार पाडली आहे. तसेच पोसई सुबोध जमदाडे, यांचे पथकातील श्रेणी पोसई बिराजी पारेकर, सहा.फौ. शिवाजी घोळवे, पोह प्रकाश कारटकर, पोना रवि माने, पोकॉ अजय वाघमारे, सुरज रामगुडे यांनी पार पाडली आहे.
...................
To Top