सोलापूर : 'मी एक अनाथ व्यक्ती असून माझ्याकडं विष खाण्यासाठी सुध्दा १ रुपया नाही, अशा बिकट परिस्थितीत मी लाखो रुपयांचा व्यवहार कोठून करणार ? माझ्या पुढे जीवन-मरणाचा प्रश्न उभा असताना मी हे किती दिवस सहन करू' असा सवाल उपोषणकर्त्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे विचारला आहे.
विजापूर रस्त्यावरील सुंदरम नगरातील रहिवासी महादेव नागनाथ चव्हाण असं या उपोषणकर्त्याचं नांव आहे., गेल्या सहा वर्षापूर्वी महादेवला दमाणी नगरातील भैरुरतन दमाणी अंध शाळेत अनुकंपा तत्वावर देण्यात आली होती. ज्यास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यताही दिली. तो शाळेत हजर झाल्यापासून त्यास वेतन मिळाले नाही. त्यावर महादेवने लोकायुक्तांकडे तक्रारी अर्ज दिला.
तेथूनच महादेव अधांतरी झाला, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी, १७ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्रानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील जिव्हाळा मतिमंद कर्मशाळा, या शाळेत महादेवची प्रथम तीन वर्षांसाठी दरमहा दोन हजार रुपये मानधनावर नियुक्ती केली.
जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी ही नियुक्ती देत असताना महादेवची पूर्वीची विचारात घेतली नाही. त्याचे वेतन द्यायचे किंवा कसे याबाबत कोणतीही भाष्य नाही. अशा स्थितीत अंत्रोळी येथील जिव्हाळा मतिमंद कार्यशाळेत, प्रथम तीन वर्षांसाठी दरमहा दोन हजार रुपये मानधनावरील अंत्रोळी येथील मतिमंद कर्मशाळेतील नियुक्ती जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्देश आहे.
महादेवाच्या मागणीप्रमाणे दमाणी अंधशाळेमध्ये स्वयंपाकी या पदासाठी माझ्या बिकट परिस्थितीमुळे आर्थिक व्यवहार झाला नाही, म्हणूनच मला लांबच्या शाळेत टाकले आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय असल्याने शेवटी सोमवारी, २५ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचे महादेव चव्हाण यांनी सांगितले.