मंगळवेढा : जोपर्यंत रेशन मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत वयोवृध्द निर्मळ दाम्पत्यांने आंदोलन सुरु केल्याचे पाहून मंगळवेढा तहसीलदार जाधव यांनी त्याची दखल घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून सर्व अधिकाऱ्यांना सूचना देत माझ्यापर्यंत कुठलीही तक्रार आली नाही पाहिजे. तसेच वयस्कर व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची भविष्यात काळजी घेण्यात यावी, असेही सूचित केले.
बोराळे येथील आनंद निर्मळ व त्यांच्या पत्नी रेशन मिळत नाही, म्हणून तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत रेशन मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनास प्रारंभ केला. यानंतर मंगळवेढा तहसीलदार जाधव यांनी तात्काळ बैठक बोलाऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावला.
यावेळी वयस्कर आजोबा आनंद निर्मळ यांना तात्काळ रेशन देण्याची सूचना देण्यात आली, तसेच त्यांचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या.