सोलापूर दि.२७ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणा झाली. पुरस्कार वितरणाचे ०७ वर्षे असून सोमवारी, ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार
संजय आठवले (दै. सुराज्य मोहोळ तालुका, प्रतिनिधी), अमोल साळुंके (दै. पुढारी सोलापूर शहर रिपोर्टर)
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रज्ञा वाघमारे (मुख्याध्यापिका ) हि.ने.न.शहा कन्या प्रशाला, बार्शी, शोभा मारकड (सहशिक्षिका), पांडुरंग विद्यालय, कटफळ ता. माळशिरस.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार बशीर बागवान (प्राचार्य) नागनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोहोळ, मनोहर इंगोले (मुख्याध्यापक ) श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी, ता. सांगोला, नितीन गायकवाड (मुख्याध्यापक) सावित्री कन्या प्रशाला रानमसले ता. उत्तर सोलापूर, शिवाजी जगताप (सहशिक्षक), सिध्देश्वर विद्यालय यावली ता. मोहोळ, रतन शिवशरण (उपशिक्षक), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवनाथवाडी ता. पंढरपूर, युवराज जाधव (उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलवाडी आंधळगांव ता. मंगळवेढा, बसवराज गायकवाड (उपशिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, वागदरी ता. अक्कलकोट
राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार
किसन कांबळे, (व. लिपिक) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व महात्मा फुले उच्च ज्युनिअर कॉलेज कुर्डुवाडी ता. माढा, सोमनाथ साळुंखे (क. लिपिक) सानेगुरुजी विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालय अंत्रोळी ता.द. सोलापूर, नानासाहेब भालशंकर (प्रयोगशाळा परिचर) शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय कुंभारगांव ता.करमाळा, संजय गडदे (सेवक) लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, सोलापूर,
या पुरस्करांचे वितरण आ. प्रणिती शिंदे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, समाजकल्याण विभाग सोलापूरचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर, जि. प. सोलापूर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मारुतीराव फडके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, सोमनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर, प्राथमिक विभागाचे वेतन अधीक्षक व्ही. डी. ढेपे, माध्यमिक विभागाचे प्रकाश मिश्रा, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रु जाधव, जैन गुरुकुलचे प्राचार्य आशुतोष शहा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात महासंघाचे निवृत्त पदाधिकारी, सभासद यांचाही यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, बाळासाहेब डोळसे, राज्य संघटक प्रा. अशोक पाचकुडवे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, सेक्रेटरी रवी देवकर, उपाध्यक्ष उपप्राचार्य पी. एस. शिंदे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मुर्तीचा सहकुटुंब सत्कार करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, शाल, बुके असे पुरस्काराचे स्वरुप आहे, असेही सांगण्यात आले.