मोहर्रम दुर्वेश पंजे सवारीच्या 51 मशालींसह शांततेत साजरा...! मोहर्रम कमिटीनं मानले पोलीस आयुक्तांचे आभार

shivrajya patra

सोलापूर : येथील मोहर्रम कमिटीच्या 51 मशालींनं शुक्रवारी, 26 जून रोजी मोहर्रम सणाची सांगता झाली. या काळात पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि परंपरेचं पालन करताना, परंपरेच्या मशाल मिरवणुकीला कोणताही अडथळा न येता, सर्व निर्विघ्नपणे पार पडले. यासाठी मोहर्रम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांना शाल-पुष्पगुच्छ देऊन सोमवारी सायंकाळी आभार मानले.

शहरात सर्व धर्म आणि समाजाचे सण-उत्सव आपापल्या परंपरांचं पालन करीत साजरे होत आले आहेत. आजवरच्या परंपरेने मोहर्रम साजरा होत असताना, 

गटा-तटाच्या मागण्यात यंदाच्या वर्षी पोलीसांकडून प्रारंभी दुर्वेश पंजे सवारीच्या 11 मशालींना परवानगी देण्यात आली, जी आजवर 51 मशालींसह निघत होती.

मोहर्रम कमिटीनं पोलीस प्रशासनाकडं पाठपुरावा करताना आजवरच्या धार्मिक परंपरेचं महत्व प्रशासनापुढं विशद केल्यावर पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून 51 मशालींसह मिरवणूक निघण्यास अनुमती देण्यात आली. 



शहरातील मोहर्रम सर्वांच्या सहकार्यानं शांततेत पार पडला. यानिमित्तानं मोहर्रम कमिटी, सोलापूर शहरच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांची भेट घेऊन त्यांचं आभार व्यक्त केले. यावेळी शहर कमिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

****

To Top