पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी क्रेडाईचा मदतीचा हात !

shivrajya patra

सोलापूर : पूरबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी क्रेडाई महाराष्ट्र च्या वतीने क्रेडाई सोलापूरकडून १००० शैक्षणिक साहित्य संचांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात वितरण कार्यक्रम गुरूवारी, 30 ऑक्टोबर रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तिऱ्हे येथे पार पडला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी क्रेडाईच्या सामाजिक बांधिलकीचे, तत्पर प्रतिसादाचे आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील पुरबाधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच — दप्तर, १२ वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, २ पेन व पॅड आदी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवसंजीवनी मिळावी, हा क्रेडाईचा उद्देश आहे.

कार्यक्रमादरम्यान क्रेडाई सोलापूर चे अध्यक्ष अभिनव साळुंखे सांगितले की, “वास्तू विकासाबरोबरच सामाजिक जबाबदारी पार पाडणे हेही आमचे कर्तव्य आहे. शिक्षणाला आधार देणे म्हणजे भविष्याला दिशा देणे.”

कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभिनव साळुंखे, उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव राजीव दीपाली, माजी अध्यक्ष अभय सुराणा तसेच क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी, व क्रेडाई नॅशनल चे कार्यकारिणी सदस्य सुनील फुरडे, जि. प. शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग आदी उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी क्रेडाई महाराष्ट्र कडून १००० शैक्षणिक वस्तू संच उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रेडाई सोलापूर तर्फे क्रेडाई महाराष्ट्र व पूरग्रस्त मदत निधी मध्ये योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

To Top