सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत कासेगाव पोलीस दुरक्षेत्र येथे शुक्रवारी, 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार बाणेवाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज भंडारी, पोलिस अंमलदार सांच्यासह उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय पवार, माजी अध्यक्ष अल्लाऊद्दीन शेख, रामहरी चौगुले, ग्रामसेवक आर. एस. कलाल लक्ष्मण जाधव, पंढरीनाथ खारे, लखन जाधव, भरत जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
