कासेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने शहिद स्मारक पूजन करीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी, 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी कासेगांव पोलीस दूरक्षेत्र चे बीट अंमलदार पीएसआय महेश घोडके तसेच ज्येष्ठ नागरिक सुधाकर काळे यांच्या हस्ते शहिद स्मारक पूजन करण्यात आले, तद्नंतर सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एस. कलाल ग्राम महसूल अधिकारी आरिफ हुडेवाले, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव, नारायण जाधव,  संभाजी चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष संजय पवार,  माजी ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पाटील, रामहरी चौगुले, माजी तंटामुक्त अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, 

नेताजी पाटील, विश्वजीत चौगुले, प्रकाश हेडे, गुरुदास काटकर, दत्तात्रय काटकर, राजाभाऊ वाडकर, माजी सैनिक इलाही तांबोळी, लक्ष्मण वाडकर, बीट अंमलदार बाणेवाले, 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी-शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

To Top