स्वामी समर्थ मूकबधिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
धाराशिव : दिव्यांग विद्यार्थी सेवा हीच खरी राष्ट्रीय सेवा असल्याचे मत माढ्याचे सुपुत्र तथा उपजिल्हाधिकारी अभिजित थोरबोले यांनी व्यक्त केले.
येथील श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेत शुक्रवारी, ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी अभिजित थोरबोले बोलत होते.
प्रारंभी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं, स्वातंत्र्यलढ्यात अतुलनिय योगदान दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन अन् त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीत गायन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत थोरबोले संजय रहेजा जितेंद्र घोडके उमेश मैराण, अशोक वाघमारे व महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शकिल शेख होते.
माढ्याचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी अभिजित थोरबोले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेष दिले, सोलापूरचे उद्योगपती संजय रहेजा यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले, तसेच धाराशिव येथील समाजसेवक जितेंद्र घोडके, उमेश मैराण, अशोक वाघमारे यांनी खाऊ वाटप केले. 
या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे आपल्या धाराशिवची शान असल्याचे गौरवोद्गार समाजसेवक जितेंद्र घोडके यांनी काढले.
यावेळी सर्व दिव्यांग विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले तर भिमराव पाथरुड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा ओहोळ, विठ्ठल होरडे, संजय म्हमाणे, नागेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
