दिलीपराव माने शिक्षण संकुलनामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डी. एम. प्री प्रायमरी, दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी, 79 स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक (सोमपा) वसंत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, संस्थेच्या संचालिका माजी सभापती रजनी भडकुंबे, होनसळच्या सरपंच सविता गायकवाड, विठाबाई हेडे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, माजी विद्यार्थी सुयोग गायकवाड, प्रणाली गायकवाड, प्रल्हाद साबळे, अण्णाराव गायकवाड यांची प्रमुख  उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल रेल्वेचे टी. सी. अधिकारी दत्तात्रय माने होते.

कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतून दहावी, बारावी प्रथम आलेले विद्यार्थी अस्पीया पटेल, आरती गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच देशाच्या संशोधन क्षेत्रात काम करणारा प्रशालेचा माजी विद्यार्थी सुयोग गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. 

यावेळी नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत देशभक्तीपर गीते भाषणे सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर पवार यांनी केलं तर तात्यासाहेब तांबे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. 

याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, होनसळ, राळेरास, हगलूर गावातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top