'विषय गुद्द्याचा नाही, मुद्याचा आहे,' अनुभवाचं तर ' गिन्नाड ' पहायलाच हवा; १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित

shivrajya patra

मराठी सिनेसृष्टीला समृध्द करण्यासाठी आजवर अनेकांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. हल्ली सर्वत्र गुद्दा-गुद्दीवर चर्चा सुरु असताना, तुळजाई फिल्मस् निर्मित 'गिन्नाड' हा मराठी चित्रपट शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी मुद्यांचा विषय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सिनेरसिकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे आहेत. चित्रपटात शशांक शेंडे, संजय खापरे, स्वप्निल पवार, प्राजक्ता नवनाळे, सचिन ससाणे यांच्यासह अनेक कसदार कलाकार आहेत.

चित्रपट निर्मितीत प्रत्येक बाजू आपापल्या परीने काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नात असते. असाच वेगळा मुद्दा घेऊन 'गिन्नाड' ची निर्मिती झालीय. चित्रपटात हिरो-हिरोइन ची प्रेम कथा गुंफताना, आज 'झाकली मूठ, सव्वा लाखाची' या पद्धतीनं मोबाईल कंपन्यांच्या सेवेवरच मनमानीवर या चित्रपटानं सवाल खडा केलाय. त्यामुळे हा चित्रपट विषय गुद्दयाचा नाही, मुद्याचा आहे, हे चित्रपट रसिकांना दिसणार आहे.

'गिन्नाड' चे दिग्दर्शक सचिन बाबुराव ससाणे, निर्माता : शिवाजी ससाणे असून छायाचित्रणाची जबाबदारी सुनीत गुरव उत्तमपणे पेलली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सचिन ससाणे यांची असून संवाद सचिन ससाणे आणि अजित दळवी यांचे आहेत. अशोक गुरव, उदय जाधव, शुभम एडके, गणेश नारायण सहाय्यक दिग्दर्शक असून संगीतकार तुषार देवल तर गीतकार अश्विनी शेंडे आहेत.

या चित्रपटाचं एडिटिंग, डबिंग आणि मिक्सिंग सातारा येथील मॅडस्कील स्टुडिओत निखिल गांधी यांनी केलं आहे. कला दिग्दर्शक राजन खाडे आहेत. वेशभूषा जगन सातपुते, रंगभूषा रवी फुटाणे यांचं तर मिलींद मोरे यांच्या बॅकग्राऊंड संगीताची त्यात भर आहे.

गिन्नाड चित्रपटाला शशांक शेंडे,संजय खापरे, स्वप्निल पवार, प्राजक्ता नवनाळे, सचिन ससानणे, प्रफुल्ल कांबळे, पूजा चव्हाण, सुनंदा शेंडे,भक्ती झणझणे,पंकज चव्हाण, सुरेंद्र साठे, बिपिन बोराटे, शशांक वाडकर, हेमंत झोरे, गणेश निगडे, शैलेश अवघडे, सायली जाधव, रवी इनामदार, तनुजा इनामदार, डॉक्टर स्वाती देशपांडे, डिंपल विश्वकर्मा आणि अमराळे यांच्या कसदार अभिनयाची जोड आहे.

शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, त्यात प्रामुख्याने प्रभात टॉकीज (गोंदिया), स्नेहल टॉकीज (तिरोडा), महावीर टॉकीज (साकोली), शंकर टॉकीज (दिग्रस), श्याम टॉकीज (बुलढाणा), श्री टॉकीज (लोणार), रिगल टॉकीज (अकोला), ज्योती टॉकीज (धुळे), माऊली टॉकीज (बीड) या शहरांचा समावेश असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सिनेरसिकांसाठी भागवत टॉकीज मध्ये ' गिन्नाड ' हजेरी लावतोय. सिनेरसिकांनी, विषय गुद्द्याचा नाही, मुद्याचा आहे, अनुभवाचं तर  ' गिन्नाड ' पहायलाच हवा !

शब्दांकन : रोहन नंदाने 

To Top