पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात होईल 10 उद्योजकांकडून 621 पदांची भरती

shivrajya patra

सोलापूर :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर, मॉडेल करियर सेंटर, सोलापूर आणि डॉ. भारत पाटील फाउंडेशन, टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी गुरुवारी, 21 ऑगस्ट रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला, असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलं आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम.कॉम, अशा प्रकारची एकूण 621 पेक्षा जास्त रिक्तपदे 10 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह गुरुवार, दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत "श्री गणेश हॉल, वागळे हॉस्पिटल जवळ, माढा रोड, कुर्डूवाडी, ता. माढा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत श्रीरंग नलावडे यांनी केले आहे. अधिक माहितीस्तव https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

To Top