समाधान प्रशालेच्या खेळाडूंची राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथील समाधान माध्यमिक प्रशालेच्या खेळाडूंची पुणे येथे सुरू असलेल्या राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी क्रिएटिव्ह म्युझिकल फॉर्म या प्रकारात निवड झाली.

स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन स्मार्ट सिटी संस्थेतर्फे येथे झालेल्या निवड चाचणीतून त्यांची निवड झाली. यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष शौकतअली शेख, मुख्याध्यापक इरफान शेख, प्रशिक्षक हरीश पटेल, ऐश्वर्या सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

निवडलेले खेळाडू :

१४ वर्षाखालील मुले : राकेश कोळी, अनुज पवार, समद नदाफ. मुली : धानेश्वरी पोळ, स्वाती पवार.

१७ वर्षा खालील मुले : शंमुख चिकले, नैतिक कांबळे, आकाश नवले, रोशन चव्हाण, सुहास

सुरवसे. 

मुली : अमृता चव्हाण

To Top