डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन आणि सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन

shivrajya patra

सोलापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स/युथ असोसिएशन आणि सावळेश्वर ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा गुरुवारी, २६ जून रोजी सायं ५ वाजता सावळेश्वर हनुमान मंदिर सभा मंडपात होत असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स/युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम (भैय्या) नवघरे यांनी दिली.

शहरी भागातील बेरोजगार तरुणाईला रोजगार मिळावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स/युथ असोसिएशनचे टाटा मोटार्सच्या सहयोगाने सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात गत सप्ताहात घेतलेल्या रोजगार मेळाव्यात आलेल्या रोजगारोच्छुक ४५ तरुण-तरूणींना ऑफर लेटर मिळाले होते.

त्यानंतर ग्रामीण भागातील सावळेश्वर परिसरातील युवक-युवतींसाठी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या रोजगार मेळाव्यात TATA MOTORS मध्ये "कमवा आणि शिकवा" योजनेअंतर्गत Mechatronics Diploma Training ! त्याचबरोबर Arts, Commerce, Science कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी, ITI मध्ये 2 वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची संधी आहे.

यावेळी मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, सावळेश्वर गावचे सरपंच सखाराम साठे, माजी सरपंच कालिदास गावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम (भैय्या) नवघरे असणार आहेत.

रोजगार मेळाव्यात TATA MOTORS मध्ये "कमवा आणि शिकवा" योजनेअंतर्गत Mechatronics Diploma Training ! मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा स्टायफंड 16, 000 पासून सुरू, दरवर्षी वाढणारा स्टायफंड, मोफत कॅन्टीन सुविधा, राहत्या गावापासून मोफत बस सेवा, BE साठी पुढील शिक्षणाची संधी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 35, 000 ते 40, 000 रुपयांपर्यंत नोकरीची हमी असणार आहे. सावळेश्वर परिसरातील युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन संयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स/युथ असोसिएशन. संस्थापक : उत्तम (भैय्या) नवघरे (भ्रमणध्वनी संपर्क : 9158555661) यांनी केलं आहे.

To Top