जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अशासकीय पदांची भरती

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय पदे भरावयाची असून, सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षीका-01 मानधन रुपये 24875/प्रतिमहा. उमेदवार हा युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी असावी. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन व संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तसेच अशासकीय पहारेकरी-01 मानधन रुपये 20886/प्रतिमहा. पहारेकरी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाचे असून पद भरतीसाठी माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल, पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच सदरील पद हे निवासी आहे. पहारेकरी पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराने रात्रीचा पहारा देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे.

तसेच अशासकीय  माळी पद -01,  मानधन प्रतिमहा13,089 रुपये, माळी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाचे असून पद भरतीसाठी माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. माळी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य राहील.

तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिक, युध्द विधवा व माजी सैनिकाची विधवा पत्नीनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रे 26, जून 2025 पूर्वी या कालावधीत जमा करावी. त्यानुसार त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील. तसेच उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ कागदपत्रे  सोबत आणावीत.

तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिक, युध्द विधवा व माजी सैनिक विधवा पत्नींनी याचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.

To Top