सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामान्य नागरिक त्यांच्या समस्या घेऊन शासन-प्रशासनाकडं दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे मागील महिना दोन-तीन महिन्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्यात काही आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, त्याकडं प्रशासन व सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते, मग अन्यायाविरुद्ध न्याय कुठे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाल्याची खंत विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलीय.
महाराष्ट्र सरकार व जिल्हा परिषद पूनम गेट येथे सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक संघटना तसेच सामान्य नागरिक बंधू-भगिनी महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी पूनमगेट येथे उपोषण करणारे आंदोलक जि. प. संरक्षण भिंतीच्यालगत एक नव्हे तर अनेक आंदोलक दोन-चार महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. 
त्यामध्ये भानुदास गोविंद माळी (तालुका बार्शी), वीरभद्र महिला मंडळ संगीता बिराजदार यांनी अवैध धंद्याविरुद्ध वीस दिवसांपासून उपोषण करीत आहे. लक्ष्मण मजूर सहकारी संस्था कार्यकारी अभियंता व ऑडिटरच्याविरुद्ध जब्बार पाटील यांनी 29 दिवसापासुन उपोषण करीत आहेत. मालक व शेतकरी कब्जे व वहीवाटदार संघटना, बेलाटी देगाव उत्तर सोलापूर जवळपास 500 हून अधिक दिवसांपासून उपोषण करीत आहेत. 
श्रीनिवास संगा यांना मोका लावा या मागणीसाठी बालाजी नल्ला 69 दिवसापासून उपोषण करीत आहेत. जिल्हा माध्यमिक शिक्षण संघ, शिक्षणाधिकारी जि. प. संघटना यांनी खडी क्रेशर बाबत 83 दिवसांपासून उपोषण करीत आहेत. बहुजन क्रांती सेना उपोषणकर्ता सोनवणे विनापरवाना मुरूम उपसा होत असल्याबाबत 121 दिवसांपासून आमरण चक्री उपोषण सुरू आहे. अशाप्रकारे लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करीत आहेत.
या आंदोलकांचा उद्देश केवळ सरकार व प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडं लक्ष द्यावे, असाच असतो. पण माय-बाप सरकार लक्ष देत नाही. त्यांची विचारपूस होत नाही, मग या लोकशाहीच्या देशात कोणाकडे न्याय मागायचा असा गहन प्रश्न निर्माण होतो. शांततेने चाललेल्या आंदोलन कधीही उग्र स्वरूप धारण करील, हे सांगता येणे कठीण आहे, म्हणून सरकार जिल्हा प्रशासन याकडे लक्ष द्यावे, अशीच अपेक्षा व्यक्त करून अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व आंदोलकांचे एकत्रित तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विष्णू कारमपुरी यांनी दिला आहे.
--- फोटो मॅटर ---
जिल्हा परिषद पुनम घेत येते वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या सर्व संघटना व नागरिकांचे एकत्रित फोटो
