पालखी मार्गांवरील समस्यांसंबंधी आयुक्तांना 08 दिवसांचा अल्टीमेटम अन्यथा रस्ता रोको : सुरेश पाटील

shivrajya patra

सोलापूर : संत गजानन महाराज पालखी रविवारी, 29 जुन रोजी सोलापूरातील तुळजापूर नाका दाखल होणार आहे. त्या तुळजापूर नाक्याच्या आजू बाजूचा परिसर व पाठीमागे व पुढे घाणीचे साम्राज्य म्हणजेच कचरा, आजोरा, माती, दिवाबत्ती, काटेरी झाडे, फुटपाथ वरिल गवत रस्त्याच्या मध्यभागी व आजू बाजू परिसरात खड्डे पडले आहेत. संत गजानन महाराज पालखी मार्गातील वरिल सर्व कामे 27 जूनपर्यंत सर्व कामे करण्यात यावीत, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला.

संत गजानन पालखी मार्गाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला पावसाळी गटरचे मॅनहोल फुटलेले आहेत. तसेच मध्यभागी काही ठिकाणी स्मार्ट सिटीतून जे सुशोभीकरण केलेले आहे, त्याला वाहनाने घडक मारून फुटलेले आहे. त्याच रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचरा, आजोरा, माती पडलेले असून सर्वत्र दुर्गंधी सुटलेले आहे. 

रूपाभवानी चौकात पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संत गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत व महापुजन करण्यात येते. त्याठिकाणी चार ही बाजूस घाणीचे साम्राज्य आहे. समोरच डम्पिंग स्टेशन असून त्या ठिकाणी घंटा गाड्या येऊन ते कंटेनर मध्ये कचरा भरून नेत असतात. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी व कचरामय झालेले आहे. सदरचा कचरा वाऱ्याने उडून वारकरी व भक्तांवर पडण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे संपूर्ण परिसर झाडलोट साफसफाई, आजोरा, माती, कचरा उचूलन 28 जुन व 29 जुन रोजी बंद ठेवण्यात यावे. रूपा भवानी चौक ते विश्रांती चौकापर्यंत पावसाळी गटार असल्याने यापूर्वी कधीही साफ करण्यात आले नाही.

तसेच पावसाळा सुरु झाले, तरी गाळ भरल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. पावसाळी गटार रस्त्यावर उंचीवर असल्याने पावसाळ्यात पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. आजवर पावसाळी गटार व मॅन होल साफसफाई न झाल्याने पाण्याचे डबके साचत आहे. या गटार मधिल गाळ काढणे, मार्गांवरील माती आजोरा काढणे, फुटलेल्या ड्रेनेज वरिल झाकण बदलणे, फुटपाथ वरिल गवत काढणे, डिव्हायडर शेजारी असलले घाण काढणे, डिव्हायडर मधिल लाईट पोलच्या वायरी झाकून घेणे, दिवाबत्ती चालू करणे, हुतात्मा स्तंभ, तुळजापूर वेस चौक शिवागंगा मंदिर संत गजानन महाराज पालखी मार्गातील वरिल सर्व कामे 27 जूनपर्यंत सर्व कामे करण्यात यावीत, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे.

रूपा भवानी चौक ते मंत्री चंडक नगरला जाणारा रस्ता खचून गाडी अडकले होते. सदरच्या रस्त्यावर हजारो भक्तगण येत असून भक्तांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावे. तसेच पालखी मार्गावरिल वेळेत काम न झाल्यास रुपाभवानी परिसरात रस्ता रोको करण्यात येईल, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. 

या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपअंभियंता रामचंद्र पेंटर, झोन क्र. 3 चे विभागीय अधिकारी बक्षी,  जे. ई. अमर मिठ्ठा,  सी. एस. आय नडिमेटला व इंगळे,  एस. आय. मुबारक शेख, अक्षय हुलसुरे, रणखांबे त्या भागातील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष व मंत्री चंडक नगरचे सोसायटीचे अध्यक्ष राजा गायकवाड, लक्ष्मण होसमनी, प्रशांत कलशेट्टी, विजय कोळी, सिद्धारूढ गंदाळ उपस्थित होते.

...कोट

निकृष्ट दर्जाचे रस्ते 2 वर्षाच्या आत खराब : सुरेश पाटील

संत गजानन महाराज यांच्या पालखी मार्गांवरील सर्व रस्ते 2 वर्षाच्या आत झालेले आहेत. ते रस्ते निकृष्ट दर्जेचे झाल्याने खराब झालेले असून रस्त्यावर पाऊस पडल्यावर रस्त्यावर व आजू बाजू परिसरात पाणी साचत आहे. रस्ता हे करार पत्रानुसार व स्पेसिफिकेशन प्रमाणे झालेले नसून या सर्व रस्त्याचे व सोलापूर शहराच्या हद्दीतील सर्व रस्त्याची चौकशी करून मक्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

सुरेश पाटील, माजी सभागृह नेता,

सो. म. पा. सोलापूर.

To Top