तपिश घरडे संशयास्पद मृत्यू प्रकरण; शुक्रवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन

shivrajya patra

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भीम आर्मीसह 14 संघटनांचं निवेदन 

भंडारा : तपिश घरडे यांच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या पालकांनी गेल्या ३७ दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. प्रशासनाने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी, 16 मे रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचा आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 14 संघटना एकत्र आल्या आहेत. या आंदोलनाला भीम आर्मीचा पाठिंबा असल्याची माहिती बुधवारी एका पत्रकार परिषदेत देण्यात आलीय. 

तपिश घरडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भीम आर्मी आणि 14 अन्य संघटना नी सुद्धा मागील अनेक दिवसांपासून उपोषणाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, मूलनिवासी  समाज, आणि जनतेच्या वतीने १६ मे रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाबाबतची माहिती देण्यासाठी व पुढील कृती ठरवण्यासाठी १४ मे रोजी दुपारी १२ वाजता, विश्राम भवन, भंडारा येथे पत्रकार परिषद पार पडली. परिषदेला अनेक मीडिया चे  पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.  

त्यांनतर सर्व संघटना नी 48 तासात योग्य तो न्याय न मिळाल्यास रस्ता रोको करण्यात येईल , अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले. यावेळी भीम आर्मी सोबत 14 संघटना चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

' रास्ता रोको ' ने सुद्धा तपिश घरडे न्याय संघर्ष समितीला यश न मिळाल्यास 01 जुलै ला आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा विचार केला जाईल, असं विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.


To Top