दु:खद ... ! सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश मोहिते यांचं निधन

shivrajya patra
सोलापूर : इतिहास अभ्यासक अमोल मोहिते यांचे वडील, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश महादेवराव मोहिते यांचं वृद्धापकाळाने गुरुवारी, 29 मे रोजी दुपारी निधन झाले. सायंकाळी 6 वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मृत्यूसमयी 83 वर्षीय होते.

मेश मोहिते यांनी पोलीस सबइन्स्पेक्टर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर ते आपल्या कार्यशैलीमुळे डीएसपी पदापर्यंत पोहोचले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चिनी भाषेचा प्रसार आणि प्रचार केला. रामलाल चौकातील डॉ. द्वारकादास कोटणीस यांच्या स्मृतिभवनात ते चिनी भाषेचा वर्ग घेत असत. 

त्यांनी सेवानिवृत्तीनंतर चिनी भाषेचे शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी स्वतःच्या हाताने श्री स्वामी समर्थांच्या पोथी चे लिखाण केलं आहे. चिनी भाषेची पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अमोल, मुली आशा व सीमा, सून, नातू नात-नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणे सर्वांना मार्गदर्शन करणे, ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्यं होती. सर्वांच्या सुख-दुःखात सामील होणारे व्यक्तिमत्व पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

To Top