सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातून दोघे तडीपार

shivrajya patra

सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जबरी चोरी आणि बनावट चावीने उघडून तसेच हॅन्डल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले. महेश हनुमान मौलावाले आणि सैफ इरफान यादगिरी अशी त्यांची नावे असून उभयतांना अनुक्रमे कर्नाटकातील विजापूर तर पुणे शहरात सोडण्यात आलं आहे.

सिद्धार्थ चौकातील रहिवासी महेश हनुमान मौलावाले (वय-२८ वर्षे) याचेविरुध्द सन २०२३ व २०२४ या कालावधीतील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून तर कुंभारी विडी घरकुलातील रहिवासी सैफ इरफान यादगिरी (वय-२५ वर्षे) याच्याविरुध्द गतवर्षात मोटरसायकल चोरी चे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून तडीपारीचा प्रस्ताव आला होता. 

त्यानुसार पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्या आदेशाने उभयतांना तडीपार करण्यात आलं आहे.


To Top