सोलापूर : येथील संगमेश्वर पब्लिक कॉन्व्हेंट स्कूल (सीबीसी पॅटर्न) ची विद्यार्थिनी कु. जिया जावीद जमादार हिने 97.60 टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचबरोबर तिने संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये प्रथम स्थानी होण्याचा बहुमान मिळविला.
कु. जिया जमादार हिने केंद्रीय शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण, हिंदी 96 , मॅथेमॅटिक्स स्टॅंडर्ड 96, सायन्स 96 आणि सोशल सायन्स 97 व अतिरिक्त कम्प्युटर अब्लिकेशन 99 गुण या प्रमाणे एकूण 600 पैकी 584 गुण प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला.
कुमारी जिया ही सिंगापूर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले जावीद जमादार यांची द्वितीय कन्या आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी तसेच आप्तेष्ठांनी अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
