सोलापूर : हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी समा सरफराज शेख हिने दहावीच्या परीक्षेत 96.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
कु. समा शेख हिने शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात 97 गुण, हिंदी 85, मराठी 92, मॅथेमॅटिक्स 99, सायन्स अँड टेक्नॉलॉजी 97 आणि सोशल सायन्स 91 व अतिरिक्त 07 गुण या प्रमाणे एकूण 500 पैकी 483 गुण प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला. 
या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनी व नातेवाईकांनी अभिनंदन करून कुमारी समा हिस शुभेच्छा दिल्या. कुमारी समा ही जेनेसेस बायोटेक कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर सरफराज शेख यांची कन्या आहे.
